माणुसकीची भिंत पुसद येथे शिवराज्याभिषेक सोहळा उत्साहात साजरा..
पुसद :६.जून.हिंदवी साम्राज्याचे संस्थापक आणि प्रथम छत्रपती म्हणून ओळखले जाणारे छत्रपती शिवाजी महाराज यांनी त्याच्या काळात गुलामगिरीने अखंड भारत ग्रासला होता,
त्यावेळेस विजापूरची आदिलशाही व मोगल साम्राज्य अशा बलाढ्य शत्रूंना तोड देत, हिंदू राजा कोणी होऊ शकेल ही कल्पनाही कोणी करू शकत नव्हते, त्यावेळेस छत्रपती शिवाजी महाप्रतापी राजांने स्वतंत्र हिंदूंचं स्वराज्य स्थापन करून व स्वतःचा राज्याभिषेक करून हिंदवी स्वराज्याची स्थापना केली,
म्हणून हा दिवस इतिहासात युगप्रवर्तक म्हणून ओळखला जातो.
अशा या महापराक्रमी,पुण्यवंत, नीतीवंत,छत्रपती शिवाजी राजे भोसले यांचा आज राज्याभिषेक सोहळा त्यानिमित्त माणुसकीची भिंत मदत केंद्र पुसद उपजिल्हा रुग्णालय येथे संपूर्ण शिवप्रेमींना शुभेच्छा देत व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेचे पुष्पार्पण व पूजन करून व त्यांच्या नावाचा जयजयकार करून रुग्ण त्यांचे नातेवाईक व पुसद मधील बेघर गरजूंना अन्नदान फळे व मिठाई वाटप करून शिवराज्याभिषेक सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
यावेळेस उपस्थित मान्यवर डॉ. आरती प्रभाकर डुबेवार,प्रभाकर डुबेवार,मधुकर चिंतावर,सचिन ओमनवार,माणुसकीच्या भिंतीचे गजानन जाधव,संतोष गावंडे,सोहम नरवाडे,अनंता चतुर,शांतिसागर ईगोले,शिवराम शेट्टे,अविनाश शेट्ट आदित्य जाधव,साहेबराव केवटे ,सिद्धी आगाम,धनंजय आगाम, दीपक घाडगे,राजू जाधव व इतर मान्यवर उपस्थित होते.