माणुसकीची भिंत पुसद येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती उत्साहात साजरी…
पुसद येथे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी महिला सक्षमीकरण,समाज कल्याणासाठी काम केले.
त्यांनी महिलांसाठी व्यावसायिक प्रशिक्षण आणि शिक्षणासाठी केंद्रे स्थापन केली,विधवांची स्थिती सुधारण्यात मदत केली.
माणुसकीची भिंत मदत केंद्र उपजिल्हा रुग्णालय पुसद येथे पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करून माणुसकीची भिंत मदत केंद्र उपजिल्हा रुग्णालय येथे समाजसेवक तथा रक्तदाते यांनी
सत्येचाळीस वेळा रक्तदान करून रुग्णांचे प्राण वाचवलेले गणेश दिंडे यांचा सत्कार सत्यपाल महाराजांचे शिष्य सप्तखंजेरी वादक पंकजपाल महाराज व माणुसकीच्या भिंतीचे अध्यक्ष गजानन जाधव यांच्या हस्ते त्यांना शिल्ड व पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार केला.
अन्नदान माननीय श्री दिनेशभाऊ लढा यांच्या जन्मदिनानिमित्त त्यांचे परममित्र माननीय श्री प्रेमभाऊ राठोड राहणार दारव्हा यांच्याकडून माणुसकीची भिंत मदत केंद्र पुसद उपजिल्हा रुग्णालय येथे रुग्ण त्यांचे नातेवाईक तसेच इतर गरजूंना पोळी, भात,भाजी व जिलेबीचे जेवण देण्यात आले.
यावेळी उपस्थित मान्यवर निखिल चव्हाण,पंकजपाल महाराज,गणेश दिंडे,प्रदीप राठोड,अमोल हगवणे,प्रदीप आढाव,शांतीसागर इंगोले,माणुसकीच्या भिंतीचे गजानन जाधव,सोहम नरवाडे,अनंता चतुर,पंजाबराव ढेकळे,आदित्य जाधव,दीपक गाडगे,दादाराव पाईकराव,उपस्थित होते..