2022 – 23 यावर्षी प्रचलित असलेल्या मालमत्ता करारानुसारच मालमत्ता कर भरावा…

नगरपरिषद पुसद द्वारे सन 2023- 24 ते 2026-27 या चतुर्थ वर्षाकरिता नवीन मालमत्ता कर आकारणी करण्यात आली आहे. नगरपरिषद मार्फत करण्यात आलेली कर आकारणी, अवाजवी असून बहुतांश मालमत्तेवर मोठ्या प्रमाणात मालमत्ता कराची वाढ करण्यात आली आहे .
त्यामुळे नवीन कर आकारणी वर मालमत्ता धारकांचा रोष निर्माण होऊन आमचे कडे, बऱ्याच तक्रारी प्राप्त झाल्या होत्या.
सदर तक्रारीच्या अनुषंगाने आम्ही मा. खासदार भावनाताई गवळी यांचे मार्फत मा. मुख्यमंत्री यांना निवेदन देऊन, तसेच सलग पाठपुरावा केल्यामुळे, दिनांक 28- 2- 2024 रोजीच्या पत्रानुसार मा.मुख्यमंत्री महोदयांनी सदर प्रक्रिये बाबत प्रस्ताव सादर होईपर्यंत, अंतरिम स्थगिती दिली आहे.
त्यानुसार यापूर्वीच आमचे द्वारे विविध वृत्तपत्राच्या माध्यमातून कळविण्यात आले होते. परंतु सण २०२३-२४ या वर्षाच्या मालमत्ता कराचा भरणा करावा किंवा कसे ,याबाबत काही मालमत्ता धारकांनी आम्हास विचारणा केली आहे.
त्यामुळे असे निदर्शनास येते की, सन 2023 -24 या वर्षाचे मालमत्ता कराचा भरणा करण्याबाबत मालमत्ताधारकांमध्ये संभ्रम निर्माण झाले आहे .
याद्वारे सर्व मालमत्ताधारकांना पुनश्च कळविण्यात येते की, सन 2022- 23 यावर्षी प्रचलित असलेल्या मालमत्ता करा नुसार, सन 2023- 24 यावर्षीचा मालमत्ता कराचा भरणा 28 मार्च 2024 पर्यंत थकबाकी असल्यास त्यासह करण्यात यावा.
नगरपरिषद्वारे प्रशासकीय ठरावानुसार थकबाकी वर दरमहा दोन टक्के शास्ती आकारणी चालू आहे .
तसेच सन 2023- 24 या आर्थिक वर्षाच्या मालमत्ता कराचा भरणा विहित मुदतीत दिनांक 28- 3 -2024 पर्यंत कराचा भरणा करावा, नाही तर दिनांक 01-04-2024 पासून त्यावर सुद्धा प्रतिमाह दोन टक्के शास्त्ती आकारण्यात येणार आहे .
त्या मुळे मालमत्ता धारकांचे नुकसान होऊ शकते सर्वांनी पुर्वि प्रमाने मालमत्ता कर भरावा आपला वाद हा वाढीव मालमत्ता करा बाबत आहे त्या करिता आपणास माहिती करिता कळविले आहे..
( अँड.उमाकांत पापीनवार)