आडगाव येथे क्रांतीसुर्य बिरसा मुंडा यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण…
क्रांतिसूर्य बिरसा मुंडांचे विचार घरोघरी पोहचवा : मा.ना. श्री नरहरी झिरवळ..
तालुक्यातील पहिल्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण सोहळा आडगाव येथे मोठ्या थाटात संपन्न झाला..
समाजाच्या न्याय हक्कासाठी बिरसा मुंडानी लढा दिला. त्यांचा आदर्श आपण नक्कीच घ्याल असा आशावाद याप्रसंगी झिरवळ साहेब यांनी व्यक्त केला.
हजारो बांधवांच्या साक्षीने सोहळा संपन्न झाला.
पुसद : दिनांक 10 मार्च रोजी तालुक्यातील आडगाव येथे आदिवासी समाजाचे जेष्ठ नेते तथा विधान सभेचे उपाध्यक्ष मा. ना. श्री.नरहरी झिरवाळ साहेब यांनी प्रांजळपणे मान्य केले की, त्यांचा स्वतःचा तालुका आदिवासी बहुल असून जवळपास ९० टक्के लोकसंख्या आहे.
तरीही अद्याप बिरसा मुंडाचा पूर्णांकृती पुतळा बसवावा अशी संकल्पना कुणाच्याही डोक्यात आली नाही. आडगाव सारख्या एका छोट्याश्या गावात पुतळा बसवण्यात आला ही समाजासाठी अभिमानाची बाब आहे .
याप्रसंगी त्यांनी आदिवासीं बेरोजगार तरुणांसाठी स्वतंत्र एमआयडीसी उभारावी तसेच तरुणांनी फार्मा प्रोडूसर कंपनी, सहयोगातून शेती करून कृषी उत्पन्न वाढविण्याचा सल्लाही त्यांनी दिला.
तसेच आपले हित कशात आहे हे समजलं पाहिजे, त्याचबरोबर टीका करण्यापेक्षा घरोघरी बिरसांचे विचार पोहोचविण्याकरिता प्रत्येक गावात असे पुतळे बसले पाहिजे. असेही ते यावेळी म्हणाले कार्यक्रमाचे अध्यक्ष पुसद विधानसभेचे आमदार इंद्रनील नाईक होते .
तर प्रमुख उपस्थिती माजी आमदार डॉ. संतोषजी टारफे, माजी उपायुक्त माधवराव वैद्य साहेब,आदिवासी विकास परिषदेचे राष्ट्रीय समन्वयक जितेंद्र मोघे, बाळासाहेब कामारकर, बी.जी. राठोड, सुरेश धनवे, सदबाराव मोहटे ,बाबू सिंग आडे, दिलीप पारध , अशोक जाधव, गजानन उघडे , विजय मोघे , भोलानाथ कांबळे, आशाताई पांडे, रामकृष्ण चौधरी, नारायण कराळे , तहसीलदार जोरवर, गटविकास अधिकारी संजय राठोड, खंडाळा ठाणेदार विलास पाटील , विराज घुईखेडकर, जयवंत वानोळे , अर्जुन हगवणे , गजानन फोपसे, शामराव व्यवहारे , श्रीकांत चव्हाण , नरेंद्र जाधव , राजेश ढगे , लक्ष्मण टारफे , ॲड.रामदास भडंगे , सह हजारो आदिवासी बांधवांच्या साक्षीने हा अनावरण सोहळा संपन्न झाला.
सर्वप्रथम क्रांतिसूर्य बिरसा मुंडा यांच्या कार्याचा गौरव करून उपस्थित आमचे आभार मानले क्रांती सूर्य बिरसा मुंडा यांचा इतिहास नवीन पिढीला माहिती व्हावा यासाठी आडगाव येथे भव्य दिव्य त्यांच्या पुतळा उभारण्यात आला आहे.
बिरसा मुंडा यांना जेमतेम 25 वर्षाचे आयुष्य मिळाली तरीही त्यांनी अपुऱ्या साधनांनी इंग्रजांसारख्या बलाढ्य शत्रु विरुद्ध लढा दिला. पिढ्यान पिढ्या शोषित पीडित समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी काम केले असल्याचे आयोजक ॲड. सुनील ढाले यांनी आपल्या प्रस्थाविकेमधून सांगितलं. आदिवासी समाजावर होत असलेल्या अन्यायाबद्दल राष्ट्रपती महोदयांना अवगत केले .
माळ पठार वरील चाळीसगाव पाण्याचा प्रश्न त्याप्रसंगी मांडला. आदिवासी विकास विभागाकडून ज्या योजना आहेत त्या सामान्य पर्यंत पोहोचत नाहीत यासाठी आवाज उठवावा असे सुनील ढाले म्हणाले. इंद्रनील नाईक यांचेसुद्धा त्यांनी आभार मानले.
आमदार नाईक यांनी आदिवासी समाजासाठी 40 कोटी चा निधी मंजूर करून आणल्याचे सांगितले आगामी काळात क्रांतिवीर बिरसा मुंडा यांचा पुसद शहरात भव्य दिव्य पुतळा होईल हेही आश्वस्थ केले.
माधव वैद्य यांनी बिरसा मुंडां यांच्या कार्याचा उल्लेख करत समाजासाठी अशा कार्यक्रमाची गरज असल्याचे सांगितले. आमदार इंद्रनिल नाईक यांनी जनतेचा सेवक म्हणून आदिवासी समाजाची सेवा मी हाती घेतली आहे त्यांच्या विकासासाठी मी नक्कीच तत्पर असल्याचे नाईक म्हणाले. नरहरी झिरवाळ यांचा उल्लेख करत त्यांची प्रशंसा केली.
डॉ. संतोष टारफे यांनी आदिवासी समाजामध्ये व्यसनाधीनतेचे मोठे अधिक प्रमाण वाढले असल्याचे सांगितलेप्, व्यसनाधीनता सोडने हीच खरी क्रांतिवीर बिरसा मुंडांना श्रद्धांजली ठरेल असे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सुनील वंजारे सुनील ठाकरे रामचंद्र ठाकरे अनिल ढाले , संतोष गारुळे , अश्विन मुकाडे , रवी मुकाडे , मोहन ठाकरे, अरविंद बोलके विकी वंजारे नंदकिशोर आमले भगवान वंजारे नंदेश चव्हाण उमेश राठोड, अतुल पवार सतीश पवार अश्विन चव्हाण साहेबराव चव्हाण, उत्तम चव्हाण, ब्रिज नंदन वंजारे उल्हास वंजारे, पवन पोटफादे , गजानन टारफे, जयवंत भुरके राजू गायकवाड , आश्विन मुकाडे, यांनी अथक परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा नरेंद्र जाधव यांनी केले तर आभार श्रीकांत चव्हाण यांनी मानले..