व्हॉइस ऑफ मीडियाच्या सा.वी.यवतमाळ जिल्हाध्यक्षपदी राजेश ढोले यांची निवड!…
यवतमाळजिल्हासचिव पदी राजेश सोनुने, व कार्याध्यक्षपदी शेख शब्बीर, तर उपाध्यक्षपदी विजय निखाते
यवतमाळ जिल्हा व्हॉइस ऑफ मीडियाच्या विविध पदावर कार्यकारणीची निवड!
व्हाईस ऑफ मीडिया सा. वि.च्या जिल्हाध्यक्षपदि रिपब्लिकन वार्ता चे विदर्भ उपसंपादक राजेश ढोले यांचीतर यवतमाळ जिल्हा सचिवपदी विदर्भ न्यूज मराठीचे संपादक तथा दैनिक सायरन प्रतिनिधी राजेश सोनुने , व कार्याध्यक्षपदी पुष्पंती न्यूज चॅनलचे मुख्य संपादक शेख शब्बीर, तर उपाध्यक्षपदी दैनिक विदर्भ केसरी प्रतिनिधी विजय निखाते यांची निवड मा यवतमाळ जिल्हा अध्यक्ष संजय राठोड यांच्या हस्ते तसेच प्रमुख पाहुणे यांच्या उपस्थितीमध्ये करण्यात आली आहे.
सविस्तर वृत्त असे की
पत्रकाराच्या आणि पत्रकारितेच्या सर्वांगीण विकासासाठी आपले कार्य तसेच मूल्य आधारित पत्रकारिता विचारधारा कायम राहावी आपल्या कार्यक्षेत्रात असणाऱ्या सर्व पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी व संघटनेच्या सर्व स्तरावर संघटनेच्या मूल विचारधाराचा प्रचार व प्रसार वावा या उदात्त हेतूने आपली पत्रकारितेमधील उज्वल कारकीर्द पाहून संघटनेच्या यवतमाळ जिल्हाध्यक्षपदी, व सर्वच पदाधिकाऱ्यांची जी निवड करण्यात आली आपल्या सर्वांचे मनस्वी अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.
या वेळी प्रामुख्याने उपस्थित
व्हॉइस मीडियाचे यवतमाळ जिल्हाध्यक्ष, संजय राठोड,पुसद तालुका अध्यक्ष समाधान केवटे, दारव्हा तालुका अध्यक्ष धीरज राठोड, यवतमाळ मी मराठी चे संपादक मकसूद भाई इत्यादी प्रामुख्याने उपस्थित होत..