माणुसकीची भिंत मदत केंद्र उपजिल्हा रुग्णालय येथे निवारा व अन्नदानाकरिता आमदार अँड.इंद्रनीलभाऊ यांच्याकडून लोखंडी शेड प्रदान…
पुसद जि.यवतमाळ ..येथील उपजिल्हा रुग्णालय येथे माणुसकीची भिंतीकडून मागील आठ वर्षापासून अविरत रुग्ण, त्यांचे नातेवाईक व पुसद मधील बेघर गरजूंना अन्नदान केले जाते.परीसरातील दात्यांच्या व शुभचिंतकाच्या मदतीने दररोज दिवसातुन दोनवेळा जेवण वाटप केले जाते.
हे मदत केंद्र उघड्यावर असल्याने तिथे उन्हं व पावसापासून संरक्षण करण्यासाठी लोखंडी शेडची अत्यंत आवश्यकता होती.हे कळताच मानवीय संवेदनशीलतेसाठी प्रसिद्ध असलेले आमदार इंद्रनील नाईक यांनी लोखंडी शेड दिले.
आमदार अँड. इंद्रनील भाऊ नाईक यांनी त्यांच्या पत्नी सौ अँड. मोहिनीताई नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त ४० बाय १४ चे लोखंडी शेड देत माणुसकीचा भिंतीला अधिक बळकटी आणली.
या शेडमुळे रुग्ण त्यांच्या नातेवाईकांना ऊन पाऊस यापासून संरक्षण होणार आहे. या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे. याप्रसंगी माणुसकीच्या भिंतीच्या सर्व सदस्यांनी व महिला सदस्यांनी त्यांचे आभार मानले.
यावेळेस आमदार इंद्रनील नाईक ,मोहिनीताई नाईक डॉ.मिनल भेलोंडे वैधकीय अधिकक्षीक उपजिल्हा रुग्णालय पुसद व माणुसकीची भिंत सदस्य व महिला सदस्यां व माणुसकीची भिंत शुभचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते..