भ्रष्टाचार निपटून काढण्यासाठी येणारी विधानसभा लढणारच !आता माघार नाही ,अक्षय राठोडांचा निर्धार ..
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कारंजा – मानोरा विधानसभा मतदारसंघातील गाव,
वाडी,तांड्याला भेटी देत दांडगा जनसंपर्क वाढविण्यासाठी अक्षय राठोड हे सतत प्रयत्नशील आहेत असे पाहायला मिळतं आहे .
त्यामुळे माजी व आजी आमदारांवर खुप मोठी कसरत करण्याची वेळ आली आहे.
युवा नेते म्हणुन स्वतंत्र ओळख निर्माण केलेले अक्षय राठोड कारंजा – मानोरा विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्यास इच्छुक आहेत.
लाखों तरूण, माणसें बेरोजगार आहेत ती खेड्यांकडून शहराकडे धाव घेताना दिसतायत प्रत्येक गाव, तांडा ,वाडी खेड्याला रस्ते , पाणी व वीज मिळवून द्यायची ते खेडे गजबजते स्वंयपुर्ण करायचे हे माझे स्वप्न आहे.
आमदार झाल्यानंतर माझी वाटचाल त्या दिशेने असेल माझा मतदारसंघ हा संपूर्ण सुखी , समाधानी व्हावे हे माझे आवडते स्वप्न आहे असे मतं राठोड यांनी प्रतिनिधींशी बोलताना व्यक्त केले..