पुसद शहरातील विविध मुख्य रस्त्यावरील अतिक्रमण हटविण्याची मागणी…
पुसद शहराच्या विविध मुख्य रस्त्यावर मोठ्या प्रमानावर अतिक्रमण करण्यात आलेली आहे. या अतिक्रमणामुळे नागरिकांना विविध समस्यांचा सामना करावा लागत आहे.अतिक्रमण हटवून नागरिकांना रहदारीस रस्ता करून देण्यात यावा या करीता शिव सेनेच्या वतीने उपविभागीय अधिकारी व मा मुख्याधिकारी नगरपरिषद पुसद यांना लेखी निवेदन देऊन मागणी करण्यात आली आहे.
पुसद शहरामधील बस स्टॅन्ड ते छत्रपती शिवाजी महाराज चौक, सुभाषचंद्र बोस चौक ते डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक ते म. गांधी चौक या मार्गावर मोठ्या प्रमाणात वाढले आहे या रस्त्यावर किरकोळ विक्रेत्यांचे, हातगाड्यांचे अतिक्रमण मोठ्याप्रमाणात वाढले आहे.या मार्गावर व्यापारी क्षेत्र असल्यामुळे रस्त्यावर दुचाकी व चारचाकी वाहनांच्या अस्ताव्यस्त पार्कीग मुळे रहदारीस अतिशय अडचण निर्माण होत आहे. छत्रपती शिवाजी महाराज चौक ते सुभाषचंद्र बोस चौक याच्या दोन्ही बाजुने अवजड वाहने मोठ्या प्रमाणात रस्त्यावर उभी राहतात. त्यामुळे हा रस्ता वाहतुकीस अडथळे निर्माण करतो. विशेष म्हणजे या अवजड वाहनांना पाकींगसाठी बांधाजवळील मोकळी जागा दिलेली आहे. वाहतुक पोलिसांचा पुसद शहरातील अती महत्वाच्या चौकांमध्ये अभाव असल्यामुळे ऑटोरिक्षा चालक चौकाच्या मधोमध आपली वाहाणे उभी करूण ऑटोस्टैंड बनवित असल्याचे दृष्य पहावयास मिळत आहे.त्याचप्रमाणे सुभाषचंद्र बोस चौक ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक ते मा गांधी चौक यामध्ये रस्त्यावर भाजीविक्रेत्यांचे गाडे पुर्ण रस्ता व्यापुन टाकतात. जेंव्हा की त्यांना पोलीस स्टेशन समोर गाळे बांधुन देण्यात आलेले आहेत. तेथे न जाता रस्त्यावर दोन-दोन गाड्यांच्या लाईन लावून रहदारीला अडथळा निर्माण करतात. वरिल सर्व प्रकारांमुळे आधीच संवेदनशील असलेले हे शहर वाहतूकीला अडचन निर्माण होत असल्याने वाहन चालकांन मध्ये वाद निर्माण होऊन अनुचित प्रकार घडून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवु शकेल हे नाकारता येणार नाही.
या गंभीर बाबीची प्रशासनाने दखल घेऊन अतिक्रमण हटवावे अशी मागणी करण्यात आली आहे.अवजड वाहनांच्या पार्कीगसाठी दिलेल्या जागी पार्कींग केल्यास रस्ता मोकळा होईल. तसेच हातगाडीवाले फळ व भाजीविक्रेत्यांना पोलीस स्टेशनसमोर मार्केट तयार करुन दिले आहे. त्यांना तिथे बसविले तर शहरातील मुख्य चौक रिकामे व स्वच्छ होतील. दुकानासमोरील वाहने जर दुकानदारांनी व्यवस्थीत लावले तर रस्ता मोकळा होवू शकतो. कापड लाईनमध्ये ऑटोरीक्षा व चारचाकी वाहनांचा प्रवेश बंद केल्यास वारंवार ट्राफीक जॅमचा त्रास होणार नाही. मात्र यात वाहतुक पोलीसांची जबाबदारी मोठी आहे. त्यावर लक्ष केंद्रीत करावे. सदर उपाययोजना केल्यास कुणाच्याही व्यापारी परिणाम न होता व वाहतुक व्यवस्था सुरळीत होईल.असा आशावाद ही निवेदनात नमुद करण्यात आला आहे.शहरातील अतिक्रमण हटवून नागरिकांना दिलासा न दिल्यास दिपक काळे उपजिल्हा प्रमुख, दिपक उखळकर शहर प्रमुख, अनिल चव्हाण संघटक, सोपान माने तालुका संघटक, लक्ष्मण आगाशे, संजय बयास तालुका प्रमुख यांनी आंदोलनाचा इशारा ही देण्यात आला आहे.